नागपूर,
'Garja Maharashtra Maja' रिदम ऑफ नागपूर आयोजित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम दत्ताजी दिडोळकर भवन, संस्कार भारती, न्यू स्नेहनगर, पांडे लेआउट येथे मोठ्या उत्साहात झाला. कार्यक्रमाचे आयोजन रिदम ऑफ नागपूरच्या टीमकडून करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वी नियोजनात उराडे, पूर्णिमा वढाई, प्रियंका वानखेडे, रेखा बदानी, वीणा मोहुरले आणि सोनाली भोसले पवार या मुख्य टीम मेंबर्सनी परिश्रम घेतले.
'Garja Maharashtra Maja' विशेषत: १११ महिलांनी पारंपरिक मराठी पेहरावात सहभागी होत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. पारंपरिक व सांस्कृतिक रंगांनी नटलेला हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी ठाकरे, मानसी, नेहा बजाज, कृतिका आमले, श्वेता बोरकर आदी उपस्थित होत्या.