मित्रानेच केले तिचे आयुष्य उद्धवस्त

- कामठीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    दिनांक :04-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault अल्पवयीन मुलीला एका तरुणाशी मैत्री आयुष्य उद्धवस्त करणारी ठरली. त्या तरुणाने मैत्रीत दगाबाजी करीत तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. ही संतापदायक घटना जुनी कामठी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. विपूल पाटील (२७, रा. कन्हान) असे आरोपीचे नाव आहे.
 

sexual assault 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विपूल हा डीजे वाजविण्याचे काम करतो. तर पीडित १६ वर्षीय मुलगी ही इयत्ता अकरावीला शिकते. वर्षभरापूर्वी मैत्रिणीच्या माध्यमातून पीडितेची ओळख विपूलशी झाली. पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवून मैत्री केली. मात्र, त्याने मैत्रीचा गळा आवळला. संधी मिळताच त्याने तिच्यावर अत्याचार केला. २ एप्रिल रोजी तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर जबरीने अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडितेला मोठा धक्का बसला. काही दिवसांपासून ती शांत होती. कुटुंबात फारशी बोलत नव्हती. तिच्याकडे पाहून ती नैराश्यात गेली असावी, असा अंदाज आईने बांधला.sexual assault विश्वासात घेऊन विचारपूस केली असता वरील घटना पुढे आली. आईने पीडितेसह पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान ६ महिन्यांपूर्वी विपूलने अशाच प्रकारे एका मुलीचे आयुष्य उद्धवस्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.