आता किती राज्यात भाजपाची सत्ता?

    दिनांक :04-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
BJP देशातील पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये केरळ आणि तामिळनाडू वगळता भाजपाला प्रचंड मोठे यश मिळाले. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली आहे. गेली १५ वर्षे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. मात्र, ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाल्याने आता भारतामधील आणखी एक राज्य भाजपाच्या ताब्यात आले आहे. यामुळे देशातील भाजपशासित राज्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम बंगालच्या विजयानंतर आता देशातील २२  राज्यांमध्ये भाजपा किंवा भाजप आघाडीचे सरकार असेल. हे भाजपासाठी खूप मोठे यश मानले जात आहे. तर दुसरीकडे केरळच्या रूपाने डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला आहे. केरळमधून डाव्यांचे सरकार गेल्याने आता ‘डावेमुक्त भारत’ झाला आहे.
 
bjp 
BJP देशातील भाजपाचे सरकार असलेली राज्ये कोणती?
महाराष्ट्र
हरियाणा
दिल्ली
राजस्थान
गुजरात
मध्य प्रदेश
गोवा
उत्तराखंड
उत्तरप्रदेश
बिहार
सिक्कीम
मेघालय
अरुणाचल प्रदेश
नागालँड
मणिपूर
आसाम
त्रिपुरा
पश्चिम बंगाल
ओडिशा
छत्तीसगड
आंध्र प्रदेश
पुद्दुचेरी
BJP उर्वरित राज्यांमध्ये कोणत्या पक्षांची सत्ता
पंजाब- आम आदमी पार्टी
मिझोराम- झेडपीएम
झारखंड- झारखंड मुक्ती मोर्चा
केरळ- काँग्रेस
तामिळनाडू- टीव्हीके
हिमाचलप्रदेश- काँग्रेस
कर्नाटक- काँग्रेस
तेलंगणा- काँग्रेस