- बुटीबाेरी पाेलिसांचे माैन ः नवव्या माळ्यावरुन उडी घेऊन आत्महत्या
अनिल कांबळे
नागपूर,
IIIT student dies शहरातील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत (आयआयआयटी) द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्रेयश चंद्रकांत माने याने वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी त्याने हा टाेकाचा निर्णय घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, श्रेयशचा मृत्यू संशयास्पद असून बुटीबाेरी पाेलिसांनी या घटनेबाबत माैन बाळगल्यामुळे संशय निर्माण झाला आहे.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर ही देशातील नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. संस्थेच्या वसतीगृह प्रांगणात सकाळी सहाच्या सुमारास श्रेयश रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला आढळून आला. मुळचा पश्चिम महाराष्ट्रातील काेल्हापूर येथील रहिवासी असलेला श्रेयश हा गेल्या काही दिवसांपासून वर्गात नियमित येत नव्हता. वसतीगृहात चाैथ्या माळ्यावरील खाेलीत राहणारा श्रेयस इतर विद्यार्थ्यांशी देखील मनमाेकळेपणाने बाेलत नव्हता. साेमवारी परीक्षेचा पहिला पेपर असतानाही ताे खाेलीतील अन्य सहकारी मित्रांशीही ार बाेलत नव्हता.
IIIT student dies मुलांच्या वसतीगृहात राहणाèया श्रेयसने नवव्या माळ्यावरून पहाटे चारच्या सुमारास उडी घेतली. सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने बुटीबाेरी पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत न्यायवैद्यक, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले. श्रेयस रहात असलेल्या खाेलीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली काेणतीही चिठ्ठी पाेलिसांना सापडली नाही. त्यामुळे श्रेयसने नेमक्या काेणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा अद्याप उलगडा झालेला नाही. बुटीबाेरी पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करत श्रेयसच्या कुटुंबियांना माहिती दिली. सायंकाळच्या सुमारास कुटुंबिय नागपुरात दाखल झाले. पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करत आत्महत्येच्या कारणांचा शाेध सुरू केला आहे. पाेलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीत ताे पहाटे चारच्या सुमारास एकटाच लिफफ्टमधून नवव्या माळ्यावर गेल्याचे दिसत आहे.
कुटुंबीयांच्या आग्रहामुळे अॅडमिशन
श्रेयशला अन्य क्षेत्रात करीअर करायचे हाेते. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आग्रहाखातर त्याने इच्छा नसतानाही ट्रिपल आयटीला प्रवेश घेतला हाेता. त्यामुळेच ताे तणावात हाेता, अशी चर्चा आहे. श्रेयशला या अभ्यासक्रमात विशेष रस नव्हता. ताे वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावर राहत नव्हता. तरीही ताे तेथे गेला कसा आणि आणि नवव्या माळ्यावरून त्याने उडी घेतली, कशी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात बुटीबाेरी पाेलिस श्रेयशच्या आत्महत्येबाबत काेणतीही माहिती देण्यास तयार नसल्यामुळे काहीतरी घातपात असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
..