पुलगाव
pulgaon news जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत अवैधरित्या साठवलेल्या खताचा भांडाफोड केला. रविवारी दुपारी ३ वाजता नाचणगाव बसस्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी एका घरामध्ये विनापरवानगी खत साठवलेले आढळले.
pulgaon news मिळालेल्या माहितीनुसार, खतसाठा एनजीपी अॅग्रो केअर इंझाळा या कृषी सेवा केंद्राचा आहे. संबंधित केंद्राने साठवणुकीसाठी आवश्यक परवानगी घेतलेली नव्हती. गोदामात विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात खत आढळून आले. त्याची किंमत ७ लाख रुपयांच्या घरात आहे. तो खतसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरिकर व जिपचे कृषी विकास अधिकारी शिवा जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. भरारी पथकाचे प्रमुख संदीप ढोणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रमोद पेटकर, गुणवत्ता निरीक्षक राजेश अंबुलकर, कृषी अधिकारी महेश पालवे, पुलगावचे मंडळ कृषी अधिकारी रितेश करोडे यांनी ही कारवाई केली.
खत विक्रीवर तत्काळ बंदी
pulgaon news तपासणीदरम्यान खत नियंत्रण आदेश १९८५ च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही अधिकार्यांना आढळले. अनेक खताच्या पिशव्यांवर आवश्यक माहिती छापलेली नव्हती. तसेच सर्व पिशव्यांवर एकच बॅच क्रमांक आणि एकाच उत्पादन महिन्याची नोंद असल्याचे दिसून आले. जे नियमबाह्य आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ संपूर्ण खतसाठ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.