झाडांची तोड थांबवा, वैज्ञानिक छाटणीला प्राधान्य द्या

नप अध्यक्ष मोहिनी नाईक यांचे निर्देश

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
mohini-naik : शहरात अलीकडे वीज तारांमध्ये आल्याच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात झाडांची संपूर्ण तोड केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याची गंभीर दखल घेतली आहे.
 
 
y4May-Mohini
 
यावेळी नप अध्यक्षांनी स्पष्ट निर्देश दिले की, झाडांची संपूर्ण तोड करणे हा उपाय नसून वैज्ञानिक पद्धतीने छाटणी करूनच वीज लाईनची अडचण दूर करावी. यासोबतच काम करताना योग्य साधनांचा वापर करणे, तसेच पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 
 
तसेच, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना पूर्वसूचना देणे आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवून काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी संबंधित अधिकाèयांना सांगितले.
 
 
झाडे ही आपल्या सर्वांची संपत्ती असून, त्यांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शहर हरित ठेवण्यासाठी झाडांची तोड न करता योग्य छाटणीवर भर देण्यात यावा, असेही आवाहन नप अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी केले.