'जाना था लखनौ पोहोच गए भोपाल'

    दिनांक :04-May-2026
Total Views |
लखनौ,
Keshav Prasad Maurya and Brajesh Pathak news खराब हवामानामुळे उत्तर प्रदेशातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विमानप्रवास अचानक बदलावा लागला. केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हे दिल्लीहून लखनौकडे येत असताना त्यांच्या विमानाला लखनौ विमानतळावर उतरता आले नाही. जोरदार वारे आणि कमी दृश्यमानता यामुळे सलग तीन वेळा प्रयत्न करूनही विमान सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले नाही. अखेरीस वैमानिकांनी निर्णय घेत विमान भोपाळकडे वळवले आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तेथे सुरक्षित उतरले.
 
 

केशव प्रसा 
या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला. हवामानातील अचानक बदलामुळे उड्डाण व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याआधीही विमान सेवांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, विविध विमान कंपन्यांच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक अडचणी आढळल्या होत्या. विशेषतः काही प्रमुख विमान कंपन्यांच्या ताफ्यात वारंवार बिघाड होत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे विमानसेवेच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.