ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी : रंगारी

गोंदिया परिमंडळ कार्यालयात कामगार दिन साजरा

    दिनांक :04-May-2026
Total Views |
गोंदिया
Mahavitaran Gondia सद्या उन्हाळ्याचे दिवस असून विजेच्या वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित विजेच्या पुरवठ्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उष्णतेमुळे महावितरणचे अनेक ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊन बंद पडतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या समस्येच्या निराकरणासाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी सदैव तत्परता व सावधानी बाळगावी, असे निर्देश गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी दिले आहेत.
 
mahavitaran gondia 
Mahavitaran Gondia ते गोंदिया परिमंडळ कार्यालयात आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला अतिथी म्हणून गोंदिया मंडळाचे अधीक्षक अभियंता धानसिंग राठोड, गोंदिया विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद जैन तसेच गोंदिया परिमंडळाचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनंत चवरे उपस्थित होते.
Mahavitaran Gondia कार्यक्रमाला परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अभियंत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान कामगार दिनानिमित्त तांत्रिक कामगारांचा गुणगौरव करण्यात आला. मंडळ स्तरावर निवड झालेल्या तांत्रिक कर्मचार्‍यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.