तभा वृत्तसेवा
आर्णी,
raju-todsam : तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनी आर्णी तहसील कार्यालयात आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी ध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, निवासी नायब तहसीलदार उदय तुंडलवार, प्रमोद गुल्हाने, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. संतोष आदमुलवाड, पुरवठा निरीक्षण अधिकारी जीवन राठोड यांच्यासह बांधकाम विभाग अभियंता व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
तहसील कार्यालय सभागृहात आ. राजू तोडसाम म्हणाले, राज्याचा नागरिक म्हणून राज्याचा उत्सव म्हणून आपण सर्वांनी महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करावा. आता सुरू झालेल्या जनगणणेत स्वत: भाग घ्यावा आणि स्वगणना करावी. तालुक्यामध्ये सार्वजनिक किंवा इतरही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाèयांचा सत्कार व सन्मान करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे.
यावेळी मंचावर तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र देशमुख, विलास राऊत, विशाल देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.