मुंबई
Jaywant Wadkar गेल्या काही काळापासून सोशल मीडियाचा वाढता वापर हा तेवढाच धोकादायक बनत चालला आहे. यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली असून मराठी कलाकाराला याचा मोठा फटका बसला आहे. मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले असून हजारो लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हॅकर्सनी त्यांच्या अकाउंटचा वापर करून एका फसव्या बिटकॉइन गुंतवणूक योजनेचा प्रचार केला आहे. यासंदर्भात अभिनेते जयवंत वाडकर यांनी पोलीस्त ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट टाकली होती. जी पूर्णपणे खरी वाटत होती, पण प्रत्यक्षात ती लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी तयार करण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये लोकांना किम्बर्ली मिरिलो नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले होते. क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगद्वारे प्रचंड नफा मिळवून देण्याचे आश्वासन देणारी एक फेसबुक लिंकही देण्यात आली होती. ही बनावट पोस्ट जयवंत वाडकर यांच्या सुमारे 60 हजार फॉलोअर्सपर्यंत पोहोचली. यामुळे, मोठ्या संख्येने लोक Jaywant Wadkar याला बळी पडले असावेत अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सेलिब्रिटींच्या चेहऱ्यांचा वापर करून लोकांना पटकन जाळ्यात अडकवण्यासाठीच अशा पोस्ट खास तयार केल्या जातात, असा पोलिसांचा विश्वास आहे.