ग्रामगीता म्हणजे जीवनाचे संविधान

    दिनांक :04-May-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur News नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ग्रामगीतेतून भारतीय संविधानाचा विचार दिसून येतो, असे मत मांडण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिक्षण जरी प्राथमिक स्तरापर्यंत मर्यादित असले तरी त्यांच्या लेखन, भजन आणि विचारसंपदेतून समाजव्यवस्थेचे सखोल ज्ञान दिसून येते, असे प्रतिपादन अभ्यासक देविदास घोडेस्वार यांनी केले.
 
nag
 
त्यांनी सांगितले की, भारतीय संविधान देशाच्या शासनव्यवस्थेला दिशा देते, तर ग्रामगीता ही मानवी जीवनासाठी नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शन करणारी संहिता आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये संविधानातील मूल्यांचे प्रतिबिंब आढळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुदेव सेवा आश्रम नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण दटके आणि अभिजीत वांजारी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे अशोक यावले होते.
 
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. विदर्भातून आलेल्या गुरूदेव सेवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन राजेश कुंभलकर यांनी केले. राष्ट्रसंतांच्या स्वावलंबी गाव, स्वावलंबी कुटुंब आणि राष्ट्रधर्म या विचारांचा प्रसार करून समाजात एकात्मता निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.