शिक्षेसाठी गुन्हा करण्याचा उद्देश साबित करण्याची गरज

- जिल्हा न्यायालय: हत्याकांडातील आराेपींची निर्दाेष सुटका

    दिनांक :04-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
commit crime for punishment एखाद्या गुन्ह्यात आराेपींना शिक्षा व्हावी यासाठी पाेलिसांनी याेग्य ते पुरावे गाेळा करणे गरजेचे असते. तसेच आराेपींचा गुन्हा करण्याचा उद्देश सरकारी पक्षाला साबित करता यायला हवा. अन्यथा केवळ संशयाच्या बळावर आराेपींना शिक्षा देता येणार नाही, असे निरीक्षण जिल्हा न्यायालयाने एका हत्याकांडाच्या खटल्यात नाेंदवले. गुन्हा करण्याचा उद्देश साबित न झाल्यामुळे हत्याकांडातील तीन आराेपींना निर्दाेष साेडण्यात आले. राेहित शंकर बिहाडे असे खून झालेल्या युवकाचे नाव हाेते.
 
 
commit crime for punishment
 
पाचपावली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा राेहित बिहाडे आणि मुख्य आराेपी विरेंद्रसिंह ऊफर् बाबू बकरी बब्बलसिंह रामगढीया (25, लष्करीबाग) यांची मैत्री हाेती. मात्र, काही दिवसांनी दाेघांचा वाद झाल्यामुळे त्यांच्यात वितृष्ठ आले. तेव्हा बाबू बकरीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. 14 नाेव्हेंबर 2022 राेजी रात्री अकरा वाजता राेहित बिहाडे हा मित्र विरेंद्र साेनवणेसाेबत घराकडे जात हाेता. लष्करीबागमधील तक्षशिला बुधविहारासमाेरुन जात असताना तेथे आराेपी बाबू बकरी आणि त्याचे साथिदार येसूदास ऊफर् शँकी अरविंद परमार (22, लष्करीबाग) आणि अश्वीन ऊफर् अच्छी मुकुंद इंदूरकर (22, लष्करीबाग) यांनी दाेघांना अडविले. बाबू बकरीने राेहितशी जुन्या वादातून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच वीरेंद्र यालाही मारहाण केली. त्यानंतर तिघांनी मिळून राेहितचा चाकूने भाेसकले.commit crime for punishment ताे रक्ताच्या थाराेळ्यात पडल्यानंतर आराेपींनी पळ काढला. जखमी राेहितला वीरेंद्रने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान राेहितचा मृत्यू झाला. पाचपावली पाेलिसांनी तीन आराेपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तीनही आराेपींवर मकाेका दाखल केला.
अविश्वसनीय साक्षिदाराची साखळी
आराेपींवर हत्याकांड आणि मकाेकाचा गुन्हा दाखल केला हाेता. मात्र, पाेलिसांनी पुरव्या आणि साक्षिदारांची साखळी याेग्यरित्या तयार केली नाही. त्यामुळे हत्याकांडातील तीनही आराेपी निर्दाेष सुटले. तसेच मकाेका साबित करण्यासाठी याेग्य घटक एफआयआरमध्ये नव्हते. पैशाच्या उधारीवरुन खून झाल्याचा दावा केल्यानंतर पैशाबाबत काेणतेही पुरावे सरकारी पक्ष सादर करु शकले नाही. आराेपींर्ते अ‍ॅड. गुरप्रितसिंग चंडाेक, अ‍ॅड. अमित दास, अ‍ॅड. राजेंद्र साहू, अ‍ॅड गाैरव साहू, ॲड, स्नेहल राऊत, महक सातपुते,ऋषभ मोजनकर यांनी बाजू मांडली.