पांढरकवडा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीवर कारवाई

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
pandharkawda-forest-area : पांढरकवडा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार करणाèया आरोपींवर वनविभागाने धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून शुभम प्रकाश सोयाम (19), जीवन पंडित सोयाम (44) व प्रकाश सत्तू सोयाम (45) या तीन इसमांना ताब्यात घेतले.
 
 
y4May-Shikaar
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून फिरत वन्यप्राण्यांची शिकार करीत होते. वनविभागाच्या पथकाने गोपालपूर ते कारंजा (पांढरा) मार्गावर नाकाबंदी करून संशयितांना अडवले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे फासे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
 
 
या कारवाईत या आरोपींनी राष्ट्रीय पक्षी मोर आणि सशांची शिकार केल्याचे उघड झाले. दोन्ही प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असून, त्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा आहे.
 
 
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9, 39, 48 (अ), 50 तसेच भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची वन कोठडी सुनावली.
ही कारवाई उपवनसंरक्षक यशवंत बहाळे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी विजेंद्र दुबे यांच्यासह स्थानिक वनकर्मचारी यांनी पार पाडली. या सोबत वनरक्षक व इतर कर्मचाèयांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
 
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजिवांची शिकार किंवा तस्करी आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, जेणेकरून अशा गुन्ह्यांवर आळा घालता येईल.