तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
avadhutaanubhav : राधिका लेआऊटमधील गुरुदत्त मंदिरात अनंत जोशी लिखित ‘अवधूतानुभव’ या ग्रंथाचे चैतन्य सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी प्रकाश जोगावार व श्रीधर बोढे उपस्थित होते.
चैतन्य सहस्रबुद्धे यांनी या ग्रंथाचे महत्त्व विशद करताना मानवी जीवनात नेमके मूल्य कशाला आहे तर ते संत सहवासाला, त्यांच्या सानिध्यात राहणाèया क्षणाला आहे असे सांगून संतांची वचने माणसाला पदोपदी आधार देतात. कठीण काळात धीर देतात. योग्य मार्ग दाखवतात. म्हणून खèया संतांना शरण जाऊन आपल्या जीवनाचा मार्ग योग्य चालवावा हे खरे जीवन घडवणे होय.
‘अवधूतानुभव’ या ग्रंथात गजानन महाराजांपासून श्रीकृष्ण सरस्वती महाराज, रमानंद महाराज, उद्धवबाबांच्या मौलिक आठवणी लेखकांनी शब्दबद्ध केल्या आहेत. ज्या प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करतील. हा ग्रंथ अनेक संतांच्या बोधप्रद आठवणी आपल्यासमोर उलगडेल, असे त्यांनी नमूद केले.
ग्रंथाचे प्रास्ताविक करताना प्रकाश देशपांडे यांनी हा ग्रंथ म्हणजे अनेक संतांचा लेखकाच्या जीवनात आलेला अनुभव असून तो सर्वांना प्रेरणादायक आहे असे सांगितले. लेखकाने यावेळेला ग्रंथातील काही प्रसंग मनोगतामध्ये नमूद करून संत सहवासाने व्यक्तीला जीवनाची दिशा मिळते असे सांगितले.
दत्तात्रेय जोशी व अलका बक्षी यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. संचालन मोहित जहागीरदार यांनी केले. कार्यक्रमासाठी चित्रा जहागीरदार, रेखा जोशी, मेघा जोशी, अदिती राजे व जोशी परिवाराने विशेष प्रयत्न केले. आरतीनंतर महाप्रसाद होऊन या प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.