वर्धा
Wardha crime घरफोडी करण्यासाठी चक भाड्याच्या कारचा वापर करण्यात आल्याची बाब दाखल गुन्ह्याच्या छडा लावल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोघांना अटक केली आहे.
Wardha crime मिळालेल्या माहितीनुसार, हेमलता वाडकर (४६) रा. अग्निहोत्री कॉलेजजवळ रामनगर या केदारनाथ येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या घराला चोरट्यांनी टार्गेट करून घरातून ऐवज लंपास केला. केदारनाथ येथून परतल्यावर घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर वाडकर यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. सुरूवातीला पोलिसांनी वाडकर यांच्या घराच्या आवारात असलेल्या सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासले. गोपनीय माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांना एम. एच. ४० सी. एस. २७०३ ही कार घटनास्थळावरील परिसरात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाहन मालक व चालकाचा शोध घेतला असता सदर वाहन हे प्रसन्न मेश्राम (२६) रा. चमेडीयानगर यवतमाळ याच्या ताब्यात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी प्रसन्न मेश्राम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता कार किरायाने घेऊन साथीदार साहिल घरत (१९) रा. सुरभीनगर पिंपळगाव रोड, Wardha crimeयवतमाळ याच्यासोबत संगनमत करून घरफोडी केल्याचे पुढे आले. पोलिसांनी एम. एच. ४० सी. एस. २७०३ क्रमांकाची कार, एक मोबाईल, ४ हजार रुपये रोख, चांदीच्या दोन तोरड्या व दोन जोडवे असा एकूण ६ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
Wardha crime ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजय भुसारी, गजानन इवनाथे, योगेश चन्ने, अजहर खान, राहुल भोयर, रूपेश उगेमुगे, सचिन पवार यांनी केली.