रिता बहुगुणा जोशी यांच्या पतीचे निधन

    दिनांक :04-May-2026
Total Views |
प्रयागराज
PC Joshi माजी खासदार रिता बहुगुणा जोशी यांचे पती पीसी जोशी यांचे सोमवारी सकाळी लखनौ निधन झाले. त्यांनी सकाळी सुमारे सात वाजता अखेरचा श्वास घेतला. रिता बहुगुणा जोशी यांनी त्यांच्या ही माहिती दिली.
 

pc joshi 
PC Joshi कुटुंबातील सदस्यांनुसार, पीसी जोशी काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर लखनौ येथील एसजीपीजीआयमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
पीसी जोशी हे पेशाने मेकॅनिकल इंजिनियर होते आणि त्यांनी तांत्रिक तसेच लॉजिस्टिक्स व्यवसायाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे लग्न १९७६ मध्ये रिता बहुगुणा यांच्याशी झाले होते. ते त्यांच्या साध्या, मनमिळाऊ स्वभाव आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जात होते.