भोजाजी माऊलीच्या दारी भतांसाठी सावली

विश्वस्त मंडळाचा सेवाभाव

    दिनांक :04-May-2026
Total Views |
आजनसरा
Ajansara news विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आजनसरा येथे संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना उन्हाचे चटके बसु नये म्हणून संत भोजाजी महाराज संस्थानने मंदिर परिसरात हिरव्या नेट लावत सावली तयार केली आहे.
 
ajansara
 
Ajansara news पुरणपोळीच्या नैवेद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्री दररोज हजारो भाविक भत येत असतात. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने भतांची संख्या वाढली आहे. वैशाख वणवा वाढलेला असताना माऊलीच्या दारी आलेल्या एकाही भताला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था केली आहे.
Ajansara news भतांच्या पायाला चटके बसू नये म्हणून संपूर्ण परिसरात पांढरे व व हिरव्या नेटचे आच्छादन उभारण्यात आले आहे. तप्त जमिनीवर पाण्याचा शिडकाव केला जात आहे. विश्रांती मंडपात भाविकांसाठी भलेमोठे कुलर लावण्यात आले असून पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, सचिव शिवदास पर्बत यांच्यासह राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रामा कोपरकर, रमेश ठाकरे, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, महेश कोसुरकर, शालिनी ईखार व सर्व सेवेकरी अहोरात्र झटत आहेत.