सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक विजय

    दिनांक :04-May-2026
Total Views |
बारामती
Sunetra Pawar अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसोबतच पोटनिवडणूक पार पडली. अखेर आता या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार या या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या आहेत, त्यांनी यापुर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सुनेत्रा पवार या तब्बल २,१८,९३० एवढ्या प्रचंड मताधिक्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
 

Sunetra Pawar record victory Baramati bypoll, Baramati election result 2026, 
भाजपचा मोठा विजय
आज 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर केरळमध्ये मात्र डाव्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने डाव्या पक्षांच्या एकमेव गडाला सुरूंग लावला आहे, केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे.