'हा विजय दादांसाठीच…'मिरवणुका किंवा गुलालाची उधळण नको!

सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट

    दिनांक :04-May-2026
Total Views |
बारामती,
Sunetra Pawar's heart-wrenching post बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत काही फेऱ्यांनंतरच त्यांची आघाडी वेगाने वाढताना दिसली आणि नवव्या फेरीअखेर त्यांनी तब्बल अठ्ठ्याहत्तर हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवली. या घडामोडींमुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी सामाजिक माध्यमांवरून आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा विजय दिवंगत अजितदादांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केला.
 
sunetra pawar
 
 
 
निकालाच्या क्षणी त्यांच्या आठवणींनी सर्वांना भावूक केल्याचे त्यांनी नमूद केले. याचवेळी कार्यकर्त्यांना आवाहन करत त्यांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष, मिरवणुका किंवा गुलाल उधळणे टाळण्याचे सांगितले आणि संयम राखत दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करण्याचे आवाहन केले. बारामतीच्या विकासासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले असून हा प्रवासाची केवळ सुरुवात असल्याचेही स्पष्ट केले. निर्धार, संघर्ष आणि नव्या बारामतीच्या उभारणीचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.या निवडणुकीत त्यांच्या विरोधात अनेक उमेदवार मैदानात होते, मात्र सुरुवातीपासूनच त्यांची आघाडी भक्कम राहिली. आता त्यांच्या मताधिक्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून बारामतीतील विक्रम मोडला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.