गोठ्याला आग : 4 जनावरे खाक : 2 गंभीर

शेतकऱ्याचे 10 लाखांचे नुकसान

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
the-barn-is-on-fire : सूर्य आग ओकत असताना जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीमुळे 4 गायी मृत्युमुखी पडल्या. तर एक म्हैस व एक गाय 90 टक्के जळाल्या असून गोठ्यातील स्प्रिंकलर संच, हळद बियाणे व जनावरांचा चारा संपूर्ण जळून खाक होऊन शेतकèयाचे अंदाजे 10 लाखांचे नुकसान झाल्याची घटना रविवार, 3 मे रोजी दुपारी 2 च्या दरम्यान टाकळी (राजापूर) शेतशिवारात घडली.
 
 
HJHH
 
या गावालगत असलेल्या प्रवीण पुंडलिक कदम यांच्या जनावरांच्या गोठ्याला दुपारी अचानक आग लागल्याने गोठ्यामध्ये बांधून ठेवलेल्या चार गायी मृत्युमुखी पडल्या. एक म्हैस व एक गाय 90 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रवीण कदम यांच्याकडे 2 एकर शेती असून शेतीपूरक उद्योग म्हणून त्यांच्याकडे पाच गायी व एक म्हैस होती. त्यांच्या गोठ्याला दुपारी अचानक आग लागल्याने संपूर्ण गोठा जळून खाक झाला.
 
 
रविवारी लग्नाची मोठी तिथी असल्याने, तसेच उन्हाची दाहकता जास्त असल्याने शेत शिवारात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आग लागल्यानंतर संपूर्ण गोठा जळून खाक झाल्यानंतर नागरिकांनी येऊन बाजूच्या शेतातील विहिरीतील पाण्याने आग विझवली परंतु तोपर्यंत शेतकèयाचे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते.
 
 
या अल्पभूधारक शेतकèयाकडे उदरनिर्वाहासाठी जनावरांचा आधार होता. परंतु या आगीत संपूर्ण खाक झाल्याने तातडीने मदत मिळण्याची मागणी आहे. या घटनेची माहिती मिळतात भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी घटनास्थळी भेट दिली.
तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व कृषी सहायकांनी घटनास्थळाला भेट दिली. महसूल प्रशासनाचा कोणताही कर्मचारी घटनास्थळावर पोहोचला नाही त्यामुळे महसूल प्रशासनाबद्दल नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता.