टिपेश्वर अभयारण्यात थरारक निसर्ग अनुभव

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
tipeshwar-sanctuary : टिपेश्वरमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बुद्धपौर्णिमेला आयोजित निसर्ग अनुभव 2026 मचाण आधारित वन्यजीव गणना यशस्वी पार पडली. पाण्याचे स्रोत मर्यादित असताना वन्यप्राण्यांची हालचाल विशिष्ट ठिकाणी वाढल्याने निरीक्षण अधिक प्रभावी ठरले.
 
 
y4May-Tipeshwar-1
 
 
 
टिपेश्वरमध्ये 36 मचाणांवरून रात्रभर वन अधिकारी, कर्मचारी आणि नोंदणीकृत सहभागी पर्यटकांनी रात्रभर बारकाईने निरीक्षण केले. यावर्षी तृणभक्षी आणि मांसाहारी प्राण्यांची लक्षणीय संख्या दिसून आली.
 
 
यात ठिपकेदार हरीण 133, नीलगाय 33, सांबर 27, रानडुक्कर 86, माकड 57, अस्वल 10, वन्य कुत्रे 37, जंगली मांजर 1 आणि 3 ठिपकेदार घुबडांचेही दर्शन झाले. सर्वांचे आकर्षण असलेल्या वाघाची फक्त 2 ठिकाणी नोंद झाल्याने अनेकांची निराशा झाली.
 
 
यावेळी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी आधीच ऑनलाइन नोंदणी अल्पावधीत पूर्ण केली होती. मचाणावर रात्र घालवून वन्यजीवांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचा अनुभव सर्व सहभागींसाठी संस्मरणीय ठरला. सहभागीं सर्वांसाठी जेवण व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
 
 
क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प तथा वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनाधिकारी उत्तम फड यांच्या नेतृत्वात समन्वयक सहायक वनसंरक्षक उदय आव्हाड यांच्यासोबत प्रशांत सोनुले, जगन्नाथ घुगे आणि सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.