अभिनव विचारमंचची माजी आ. डॉ. रामदास आंबटकर यांना श्रद्धांजली

    दिनांक :04-May-2026
Total Views |
हिंगणघाट,
dr ramdas ambatkar स्थानिक अभिनव विचार मंचच्या वतीने दिवंगत माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर अभिनव विचार मंचचे अध्यक्ष नितीन सुकळकर, सचिव ओमप्रकाश मुडे, दत्ता भांगे उपस्थित होते.
 

aambatkar 
 
 
यावेळी दत्ता भांगे यांनी केवळ व्यतिमत्त्व घडवण्यावरच रामदास आंबटकर थांबले नाहीत तर एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवण्यापर्यंत, मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमदारपद मिळाल्यावरही ते शेवटपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबाशी जुळून होते. नितीन गडकरींसारखे मोठे नेते असोत वा तळागाळातला कार्यकर्ता असो प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. वडनेर सारख्या गावातून आलेल्या डॉ. आंबटकर यांनी अभाविपमध्ये अनेक वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत असतानाच डॉटर असूनही स्वतःचा दवाखाना न टाकता त्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थी चळवळ व भाजपाच्या संघटनात्मक कार्याला अर्पण केले. पूर्व विदर्भाचे संघटनमंत्री व नंतर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. नागपूर विद्यापीठात सिनेट सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पुढे विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी अनेक जबाबदार्‍या समर्थपणे निभावल्या, असे सांगून दत्ता भांगे यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
 
संचालन ओमप्रकाश मुडे यांनी केले.dr ramdas ambatkar प्रास्ताविक नितीन सुकळकर यांनी केले. कार्यक्रमाला अभिनव विचार मंचचे चंद्रशेखर रेवतकर, विकास नागरकर, अरुण नौकरकर, शरद वाघमारे, विजय हटवार, विश्वास कातोरे, उमेश नेवारे, मांडवकर, किरण गेहरवार, राजेंद्र मोघे, युवराज आडे, रेणुदास नागतोडे, सारंग चरडे, मनोज ठाकरे, प्रमोद बोरकर, मनीष झाडे, महेंद्र पर्वत, काळे, आशिष बोबडे, आदी उपस्थित होते.