अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांड

मुझफ्फरपूरमध्ये रक्तरंजित घटना

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मुझफ्फरपूर,
Triple murder मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कांती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. मधुबन जगदीश गावात घडलेल्या या घटनेत पत्नी आणि दोन मुलांची हत्या करणारा आरोपी स्वतः मृत महिलेचा पतीच असल्याचे उघड झाले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष साह नावाचा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून करीना कुमारी नावाच्या विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंधात होता. या संबंधातून तो नवीन आयुष्य सुरू करण्याच्या तयारीत होता, मात्र त्याची पत्नी आणि मुले त्याच्या मार्गात अडथळा ठरत असल्याची त्याची धारणा झाली होती. याच पार्श्वभूमीवर प्रेयसीकडूनही कुटुंबाला दूर करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
 
Triple murder
 
घटनेच्या रात्री आरोपीने अत्यंत क्रूर योजना आखत पत्नीला जेवणातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. Triple murder त्यानंतर त्याने आपल्या दोन निष्पाप मुलांचाही गळा दाबून जीव घेतला. घटनेनंतर दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच खोटा गुन्हा दाखल करून तपास भरकटवण्याचाही प्रयत्न झाला.
 
मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपींच्या संभाषणांची पडताळणी केल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आणला. Triple murder विशेष तपास पथकाच्या चौकशीत संतोष साह आणि त्याची प्रेयसी यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून खुनासाठी वापरलेली दोरीही हस्तगत करण्यात आली आहे.