वर्धा,
bjp-victory-celebration : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकार उलटवून टाकल्याचा वर्धा जिल्हा भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पं. बंगालमध्ये विकत घेऊन खाललेल्या झालमुंडी (चिवडा) आणि जीलेबी वाटून तसेच ढोलतासे वाजवत फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची उपस्थिती होती. प्रसार माध्यमांसोबत बोलताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस म्हणाले की, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनितीने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची सत्ता उलटवून टाकली आहे. भाजपाचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले होते. त्यामुळेच न भुतो न भविष्यती असा निकाल आजच्या हाती आला असल्याचे माजी खासदार तडस म्हणाले.
संजय गाते यांनी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी हा आनंदचा क्षण आहे. १५ वर्षांपासून पं. बंगालमध्ये भाजपाचे कार्यकर्ते संघर्ष करीत आहेत. शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी असलेल्या पं. बंगालमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या अथक प्रयत्नातून ममता बॅनर्जी यांची अराजकता नेस्तनाबूत करून भाजपाला विजयी केले. आसाममध्ये आम्ही तीनदा निवडून आलो. पांडेचरीमूधन सुद्धा निवडून आलो आहे. केरळ आणि तामिलनाडू मधून सुद्धा निवडून आलो असल्याचे गाते म्हणाले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महिला मोर्चाच्या वैशाली येरावार, नपचे उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, गु़ंड्डू कावळे, निलेश पोहेकर, श्रीधर देशमुख, जयंत येरावार, पृथ्वीराज शिंदे, निलेश किटे, अभय नगरे, श्याम शंभरकर, सौरभ देशमुख, प्रमोद मुरारका, विलास आगे, माधव वानखेडे, अशोक कलोडे, प्रतिभा बुर्ले, आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.