कोलकाता,
west-bengal-election-result-2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवितव्याबाबत विविध प्रकारचे अंदाज समोर येत होते. एकीकडे एक्झिट पोलमध्ये संमिश्र चित्र दिसून आले होते, दुसरीकडे ज्योतिषीय अंदाजांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
अहवालांनुसार काही एक्झिट पोलमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यात चुरशीची लढत दिसून आले होते, तर काही ठिकाणी सत्ताबदलाचेही संकेत दिले जात होते. मात्र दुसरीकडे काही सर्वेक्षणांमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा सत्ता राखू शकतात असेही अंदाज वर्तवले जात होते.
दरम्यान, ज्योतिषीय विश्लेषणांमध्येही मिश्र संकेत दिले जात असून काही अंदाजांनुसार 2026 मध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी “दबावाचा काळ” असू शकतो, तर काहींनी त्यांच्या नेतृत्वाची शक्यता कायम असल्याचे म्हटले होते. शेवटी निकाल जाहीर झाला असून ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
सोशल मीडियावर सध्या “४ मे, दीदी गेल्या…” अशी एक भविष्यवाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.