मुख्यमंत्री देणार का समग्र शिक्षा कर्मचार्‍यांना न्याय ?

५७ दिवसानंतरही कर्मचारी आझाद मैदानावर

    दिनांक :04-May-2026
Total Views |
सडक अर्जुनी
indefinite hunger strike मागील २० ते २५ वर्षापासून शासन सेवेत कायमच्या प्रतीक्षेत असलेले समग्र शिक्षा अभियानाचे तीन हजारांवर कर्मचारी ९ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यात आई-वडील सेवेत कायम व्हावे यासाठी अनेक चिमुकले आपल्या आई-वडिलांसह या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या ५७ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून आता फाईल मुख्यमंत्र्यांच्या दालनात आहे. अशावेळी समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचार्‍यांना मुख्यमंत्री न्याय देणार का ? याकडे शिक्षण विभागातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
sarva shiksha abhiyan
indefinite hunger strike  सन २००१ पासून समग्र शिक्षा अभियानाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण व शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी विषयसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा, एम आय एस कोऑर्डिनेटर, इंजिनिअर, जिल्हा समन्वयक, सहा. कार्यक्रम अधिकारी अशी अनेक पदे सहा-सहा महिन्यांच्या करारावर व मानधन तत्त्वावर भरली गेली होती. सेवेत लागल्यापासून समग्र शिक्षा कर्मचार्‍यांचे अधिवेशनावरील हे १६ वे आंदोलन आहे. गत २० ते २५ वर्षात प्रत्यक्ष सेवेदरम्यान तब्बल २५७ कर्मचारी विविध कारणाने मृत्यूमुखी पडले. याच अभियानातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ८ आक्टोंबर २०२४ च्या जी.आर. मध्ये शासनसेवेत कायम केले. मात्र, इतर कर्मचारी आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्यासाठी कधी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री यांचेकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली. indefinite hunger strike  कधी रस्ता रोको, कधी झाडावर चढाई, थाळीनाद, गाण्यांच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचे काम केले. असे असताना गेल्या ५७ दिवसात अनेक खासदार, आमदार, विविध पक्ष व संघटनाचे नेते आझाद मैदानावर आले मात्र, मंत्रिमंडळातील एकही मंत्री आझाद मैदानावर फिरकले नाही. एका आंदोलकाने दिलेल्या माहितीनुसार समग्रची फाईल आता मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर असून मुख्यमंत्री या फाईलवर लक्ष देत कर्मचार्‍यांना न्याय देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
कर्मचार्‍यांना कायमची आस...
indefinite hunger strike २० वर्षापासून सर्व शिक्षा कर्मचार्‍यांचे बाबतीत ‘सकारात्मक’ शब्द ऐकत आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या समितीने सुद्धा सकारात्मक शेरा दिला आहे. या शब्दाच्या आशेवर अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. किमान मुख्यमंत्र्यांनी लाडके बहीण-भाऊ समजून उर्वरित तीन हजार कर्मचार्‍यांना कायम करण्याची आस आंदोलक कर्मचार्‍यांना आहे.