बालिकेवरील अत्याचार प्रकरणी नराधमास जन्मठेप

- २० हजारांचा दंड ; पीडितेला नुकसान भरपाईचे आदेश

    दिनांक :05-May-2026
Total Views |
गोंदिया, 
nasrapur child abuse case येथील ७ वर्षांच्या निरागस बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयाने आरोपी लक्ष्मण उर्फ मुका इसरू ब्रम्हणकर यास जन्मठेपेसह सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपीवर २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. विशेष म्हणजे, दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे.
 

atyachar prakaran 
 
 
विशेष न्यायाधीश (पॉक्सो) तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी आरोपीला पॉक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ६ तसेच भारतीय दंड संहिता कलम ३७६(एबी) अंतर्गत दोषी ठरवले. मात्र, पॉक्सो कायद्याच्या कलम ४२ नुसार स्वतंत्र शिक्षा देण्यात आलेली नाही. या खटल्यात राज्याच्या वतीने एकूण ११ अभियोजन साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मूकबधिर शाळेतील विशेष शिक्षकाचाही समावेश होता. आरोपीकडून बचावासाठी एक साक्षीदार सादर करण्यात आला. मात्र अभियोजन पक्षाने त्याची सखोल उलटतपासणी करून महत्त्वपूर्ण बाबी न्यायालयासमोर मांडल्या, ज्याची न्यायालयाने स्पष्ट दखल घेतली. दरम्यान, तपास व खटल्यादरम्यान आरोपीने भोगलेला कारावासाचा कालावधी शिक्षेतून वजा करण्यात येणार आहे. तसेच प्रकरणातील कपडे व मेमरी कार्ड यासारखी मालमत्ता अपीलची मुदत संपल्यानंतर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.nasrapur child abuse case याशिवाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांना पीडितेच्या पुनर्वसनासाठी नुकसानभरपाई निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले असून, ही रक्कम राज्य शासनाच्या ‘पीडित नुकसानभरपाई योजने’तून देण्यात येणार आहे. हा खटला गोंदिया जिल्ह्यासाठी सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता सतीश यू. घोडे यांनी प्रभावीपणे चालविला.