- सायबर शाखेत ठाणेदारपदावर सुरेश डंभारे, सुधीर बाेरकुटेंची नियुक्ती
अनिल कांबळे
नागपूर,
Police suspended एका क्रिकेट बुकीला हाताशी धरुन पुण्यातील हवाला व्यापाऱ्याकडून वसुली केल्यानंतर आर्थिक वाद उाळल्याने सायबर ठाण्यातील एका पाेलिस अधिकाऱ्याने एका हवालदाराला मारहाण केली. या प्रकाराची पाेलिस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली. प्राथमिक चाैकशीअंती सायबर पाेलिस ठाण्यातील पाेलिस निरीक्षक बळीराम सुतार, पीआय याेगेश घारेसह नऊ जणांना निलंबित करण्यात आले. सुतार यांच्या जागी दक्षिण विभाग सायबर ठाण्याची जबाबदारी सुरेश डंभारे यांच्यावर तर उत्तर सायबर ठाण्याची जबाबदारी सुधिर बाेरकुटे यांच्याकडे साेपवण्यात आली.
वरिष्ठ पाेलिस निरीक्षक बळीराम सुतार (दक्षिण), पीआय याेगेश घारे (उत्तर) आणि वादग्रस्त सहाय्यक पाेलिस निरीक्षक विजय राणे, पाेलिस हवालदार साैरभ हिवरकर, श्रीकांत गणाेकर, सुनील चंगाेले, सतीश वाघ, अजय पवार यांच्यासह राणेकडून मारहाण झालेला पाेलिस हवालदार प्रुल्ल ठाकरे याचाही समावेश आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरातील पाेलिस दलात सायबर ठाण्यांमधील गैरप्रकार चर्चेचा विषय ठरला हाेता. त्यामुळे पाेलिस दलाची प्रतिमा डागाळली गेली. सायबर ठाण्याचे विभाजन झाल्यानंतरही वरिष्ठ पाेलिस अधिकारी तपास साेडून परस्परांच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचे प्रकार सातत्याने चव्हाट्यावर आल्याने पाेलिस दलाची अब्रू वेशीला टांगली जात हाेती. हिरेन भाेजवानी नावाच्या तक्रारदाराने सायबर पाेलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून या अंतर्गत कलहाला ताेंड ुटले हाेते. राज्यात चर्चेत असलेले शालार्थ आयडी प्रकरणातसुद्धा सायबरचे पीआय बळीराम सुतार तपास करीत हाेते. या काेट्यवधीच्या घाेटाळ्याच्या तपासात सुतार यांची भूमिकासुद्धा संशयास्पद हाेती, अशी चर्चा आहे.
पुण्यातून साेडले आराेपीला
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर ठाण्यातील पथक तपासासाठी पुणे येथे गेले. त्या ठिकाणी 14 जणांना ताब्यात घेत चाैकशी करण्यात आली. क्रिकेट सट्टा बेटींगचे जाळे चव्हाट्यावर आले. एकांश नावाच्या बुकीने वेगवेगळ्या 40 हून अधिक बँक खात्यांमधून हवालाच्या 250 काेटींहून अधिक रकमेचे व्यवहार केल्याचे उघड झाल्यानंतरही पथकाने केवळ सूचनापत्रावर त्याला साेडून दिले. त्यामुळे एकांश फरार झाला.
अधिकाऱ्याची हवालदाराला मारहाण
Police suspended हा प्रकार कळताच दुसèया गटातील सायबर अधिकाऱ्यांनी याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल केली. त्यावरून अंतर्गत कलहाचा भडका उडाला. या प्रकरणात विजय राणे या वादग्रस्त सहाय्यक पाेलिस निरीक्षकाने हवालदार ठाकरेचा माेबाईल हिसकावत त्याला मारहाण केली. ठाकरे याने याची तक्रार थेट सह पाेलिस आयुक्तांकडे केली. त्या दिवसांपासून ठाकरे दाेन दिवस बेपत्ता झाला. त्याची दखल घेत पाेलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या आदेशानुसार पाेलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी गैरप्रकाराचा ठपका ठेवलेल्या अधिकाèयांसह 9 जणांच्या विभागीय चाैकशीचे आदेश जारी करत तत्काळ प्रभावाने 9 जणांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले.