हिंगणघाट,
two wheeler lakh rupees looted शहरातील मुख्य बाजारपेठेत भरदिवसा मोपेडच्या डिक्कीतून दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना काल ४ रोजी सायंकाळी स्थानिक मोहता चौकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम ठेकेदार प्रमोद देठे यांनी महाराष्ट्र बँकेतून १ लाख ५० हजार रुपये काढून पैसे दुचाकीच्या डिकीत ठेवले. त्यानंतर ते ढोमणे ज्वेलर्स येथे गेले. दरम्यान, काही मिनिटांतच चार अज्ञात चोरटे बिनधास्तपणे घटनास्थळी आले आणि डिक्की उघडून रक्कम घेऊन पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाली आहे.
काम झाल्यानंतर देठे हे पैसे देण्यासाठी मॅडमवार यांच्या कार्यालयात गेले. तेथे गाडीची डिक्की उघडताच पैसे नसल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी तात्काळ मोहता चौकातील ढोमणे ज्वेलर्स येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार चोरटे अगदी शांतपणे येऊन काही क्षणातच चोरी करून पसार झाल्याचे दिसून आले.two wheeler lakh rupees looted अनेक चोरींचा तपास लागलेला नाही. चोरटे येतात, चोरी करतात आणि सहजपणे फरार होतातहीच परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, गुन्हे अन्वेषणाची चार पथके, चार्ली पथक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असताना ना चोरीच्या घटना थांबत आहेत ना आरोपी सापडत आहेत. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.