विज्ञान शाखेतून आरती शिंदे तालुक्यात प्रथम

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
aarti-shinde : शहरातील आदर्श विद्यार्जन मंडळाच्या पंचशील विद्यालयाने बारावीच्या निकालात यंदाही उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 91 टक्के आणि कला शाखेचा निकाल 83 टक्के लागला आहे.
 
 

y6May-Aarati-Shinde 
 
 
 
विज्ञान शाखेतून आरती दत्ता शिंदे हिने 86.33 टक्के गुण मिळवून हदगाव व हिमायतनगर या दोन्ही तालुक्यांत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पूजा शिवाजी वाघमारे (74.67), प्रज्ञा सत्यप्रकाश कुंभकर्ण (72.67) आणि शुभम शंकर राठोड (71.33) यांनीही उल्लेखनीय गुण मिळवले आहेत.
 
 
कला शाखेत गंगाराम दिगंबर धाडे (80.17) यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून पल्लवी रावसाहेब वानखेडे (78.33), प्रज्ञा प्रदीप पाईकराव (77.83), अभय गौतम काळबांडे (76.17) आणि दीपाली बालाजी गायकवाड (75.83) यांनीही उत्तम यश संपादन केले आहे.
 
 
या यशाबद्दल संस्थेचे सचिव सुनील सोनुले यांच्यासह प्राचार्य अनिल दस्तुरकर, प्रा. राजेश घाटे, प्रा. प्रकाश देशमुख, प्रा. हापसे, प्रा. सोनुले, प्रा. गुंडे, प्रा. पानपट्टे, प्रा. चव्हाण, प्रा. विजय खिसे, प्रा. राठोड, प्रा. खुळे, पावडे, पतंगे व पुरुषोत्तम धुळे यांनीही अभिनंदन केले आहे.