मुंबई
Abhijeet Sawant इंडियन आयडॉलमधून घराघरात पोहोचलेला गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा आपल्या नव्या हिंदी गाण्यामुळे चर्चेत आला आहे. ‘काले बादल’ या नव्या गीताद्वारे त्याने श्रोत्यांना आपल्या सुरेल आवाजाची नव्याने जाणीव करून दिली आहे. या गाण्याला प्रख्यात संगीतकार ललित पंडित यांनी संगीत दिले असून गीतकार जावेद अख्तर यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी गाण्याला वेगळी उंची मिळाली आहे.
‘काले बादल’ हे गाणे प्रदर्शित होताच श्रोत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून विशेषतः तरुणाईमध्ये या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आपल्या खास आवाजामुळे आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे अभिजीत सावंतने पुन्हा एकदा संगीतप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
या गाण्याच्या निर्मितीविषयी बोलताना Abhijeet Sawant इं अभिजीत सावंत म्हणाला की, “आजवर अनेक गाणी केली, पण जेव्हा अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळते तेव्हा ती मोठी जबाबदारी असते. ‘काले बादल’ करताना थोडी धाकधूक होती, कारण जावेद अख्तर यांनी लिहिलेले गाणे गाण्याची संधी मिळणं ही स्वतःमध्येच मोठी गोष्ट आहे. आता हे गाणं श्रोत्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहून समाधान वाटते .”अभिजीत सावंतने ‘मोहब्बते लुटाऊंगा’, ‘सुर सुखाची श्रावणी’, ‘चाल तुरू तुरू’ आणि ‘सखे गं साजणी’ यांसारख्या विविध गाण्यांमधून आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली आहे. त्याच्या गायनाने अनेक वर्षे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले असून आता तो नव्या पिढीतील श्रोत्यांमध्येही लोकप्रिय ठरत आहे.‘काले बादल’ या गाण्यामुळे अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला असून आगामी काळात तो आणखी मोठ्या प्रकल्पांचा भाग होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संगीतप्रेमींना त्याच्या पुढील कामांची उत्सुकता लागून राहिली आहे.