आंनदवार्ता! टोल नाक्यांवर आता भाजीचा ‘हायवे हब’

    दिनांक :06-May-2026
Total Views |
मुंबई
Agri Mall at the Toll Plaza राज्यातील शेतऱ्यांसाठी एक आंनददायी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावर कृषी मॉल उभारला जाणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात पुढाकार घेत हे मोठ पाऊल उचलले आहे. शेतातून थेट टोल नाक्यावर शेतमाल विकण्याची मोठी संधी यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे वेळ, अधिकचा प्रवास खर्च आणि शेतकऱ्यांचे श्रम देखील वाचणार आहे. तर प्रवासी या टोल नाक्यावरील माॅलमधून ताजी भाजी आणि शेतमाल विकत घेता येणार असल्याने ग्राहकांच्या दृष्टीने देखील ते अधिक सोयीचे होणार आहे.
 

Agri Mall at the Toll Plaza 
नावीन्यपूर्ण प्रयोग
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि ग्राहकांना मध्यस्थांशिवाय स्वस्त व दर्जेदार शेतमाल मिळावा या उद्देशाने हा नावीन्यपूर्ण प्रयोग राबवण्यात येत आहे. महामार्गावरील टोल प्लाझा परिसरात हे ‘कृषी मॉल’ विकसित केले जाणार असून तेथे स्थानिक शेतकरी थेट आपला माल विक्रीसाठी ठेवू शकतील. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट संबंध अधिक मजबूत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या उपक्रमामुळे महामार्गांवरील प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या राज्यात टोल व्यवस्थापन अधिक डिजिटल आणि सुव्यवस्थित करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असून त्याचाच एक भाग म्हणून ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
 
 
महामार्गांवर मोठ्या Agri Mall at the Toll Plaza प्रमाणात वाहतूक होत असल्याने अशा ठिकाणी ताज्या शेतमालाची विक्री केंद्रे उभारल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, तसेच प्रवाशांनाही घरगुती वापरासाठी ताज्या भाज्या आणि फळे सहज उपलब्ध होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.राज्यातील विविध महामार्गांवर टप्प्याटप्प्याने हे ‘कृषी मॉल’ उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार असून पुढील काळात हा उपक्रम अधिक विस्तारला जाण्याची शक्यता आहे.