वणी तालुक्यात पीकविमा भरपाई रखडली

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
agriculture-crop-insurance : तालुक्यातील पीकविमाधारक शेतकèयांना 2025-26 हंगामातील नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात तालुकास्तर पीक विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांना निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी केली आहे.
 
 
PIK VIMA
 
 
 
शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांसाठी शेतकèयांनी नियमानुसार विमा काढला होता. वणी तालुक्यातील 13,707 शेतकèयांनी 12,377 हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरवला आहे.
 
 
 
ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाकडून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत काही प्रमाणात अनुदान देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात अनेक शेतकèयांचे नुकसान भरून निघालेले नाही.
 
 
शासनाच्या धोरणानुसार जानेवारी 2026 पर्यंत पीकविमा भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, तीन महिने उलटूनही संबंधित विमा कंपनीकडून कोणतीही भरपाई देण्यात आलेली नसल्याने शेतकèयांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. हा प्रकार अन्यायकारक असून शेतकèयांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
 
 
 
या संदर्भात तालुका समितीची बैठक बोलावून विमा कंपनी, कृषी विभाग आणि शेतकरी प्रतिनिधींना एकत्रित आणून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, वणी तालुक्यातील पीकविमा धारक शेतकèयांची बैठक शुक्रवार, 8 मे रोजी दुपारी 4 वाजता तहसील कार्यालय, वणी येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधित शेतकèयांनी आपल्या विम्याची पावती घेऊन स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.