तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
suraj-gupta : यवतमाळ येथील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांनी नुकत्याच झालेल्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेत्यांसोबत कार्य करण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन भाजपाला निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी दिवसरात्र एक केला.
मालदा विभागाचे भाजपाचे प्रभारी राष्ट्रीय संघटक अनंत नारायण मिश्रा तसेच मालदा विभागाची निवडणूक जबाबदारी असलेले भाजपा उत्तरप्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री स्वतंत्र देव सिंह, गाजोल विधानसभा प्रभारी बिहारचे आमदार कुमार प्रणय यांच्या मार्गदर्शनात सूरज गुप्ता यांनी निवडणूक कार्य केले.
बंगाल निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले आहे. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत त्यांच्या पक्षाचा विजय होणे हे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ऐतिहासिक व अभिमानाची बाब आहे. यासाठीच यवतमाळचे सूरज गुप्ता यांनी प्रयत्न केले.
या निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाकडून मशाल यात्रा, विजय संकल्प पदयात्रा काढण्यात आली. यात हजारो नागरिक, माता, भगिनी आणि युवकांनी सहभाग नोंदविला. मालदा जिल्ह्यातील गाजोल शहरात ही विजय संकल्प पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रेला जोरदार प्रतिसाद स्थानिक नागरिकांकडून मिळाला.
पक्षाचा आभारी आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, माजी मंत्री मदन येरावार, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांच्या मार्गदर्शनात माझी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीत काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
सूरज गुप्ता
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष