माहूरमध्ये भाजपाचा जल्लोष

तीन राज्यांतील विजयाचा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
माहूर, 
bjps-celebration-in-mahur : भारतीय जनता पार्टीने बंगाल, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष माहूर शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आला. बसस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून हा विजयोत्सव साजरा केला.
 
 
 
y6May-Mahur
 
 
 
भाजपाच्या या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहत होता. ढोलताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. या दरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांनी नृत्य करून आनंद व्यक्त केला. फटाक्यांच्या आवाजाने आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
 
 
यावेळी तालुकाध्यक्ष नीळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, राजेंद्र केशवे, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, नागोराव सुर्वे, ज्योतीराम राठोड, अपील बेलखोडे, अजय पवार, फिरोजखान पठाण, रहमत, गौरव जैस्वाल, नीलेश तायडे, अशोक जोशी, योगेश परसवाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
या विजयामुळे माहूरमधील भाजपा कार्यकर्त्यांत नवा उत्साह संचारला असून, आगामी काळातील वाटचालीसंदर्भातही पदाधिकाèयांत सकारात्मक चर्चा दिसून आली.