वाशीम,
Census 2027 training जनगणना २०२७ ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून, तिची अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्तता करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी काटेकोरपणे प्रशिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
मानोरा व कारंजा येथे जनगणना २०२७ अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी प्रशिक्षण केंद्रांतील प्रत्यक्ष कार्यवाहीची पाहणी केली तसेच प्रशिक्षणार्थी व संबंधित यंत्रणेशी संवाद साधून माहिती संकलन प्रक्रिया, डिजिटल प्रणालीचा वापर आणि क्षेत्रीय अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान Census 2027 trainingजनगणना कार्यासाठी वापरण्यात येणार्या पद्धती, अचूक माहिती नोंदणी, तसेच समन्वय यंत्रणेचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. जनगणना कार्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक स्तरावर दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.मानोरा व कारंजा येथील प्रशिक्षणाची तयारी समाधानकारक असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हाधिकार्यांनी पुढील टप्प्यातील काम अधिक गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.