काँग्रेने ओढला 'थलपती'चा विजयरथ!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
चेन्नई,
Congress supports Thalapathy Vijay तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून सरकार स्थापनेच्या समीकरणांमध्ये नवे बदल दिसून येत आहेत. काँग्रेस पक्षाने अभिनेते-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याने राज्यात नव्या सत्ताकारणाची दिशा स्पष्ट होत आहे. काँग्रेसच्या या निर्णयानंतर टीव्हीकेला सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला पाठिंबा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चेन्नई येथे टीव्हीके प्रमुख विजय यांची भेट घेऊन अधिकृत पाठिंब्याचे संकेत दिले. या घडामोडीनंतर विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 

Vijay 
सूत्रांच्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे या कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने याआधी द्रमुकसोबतची आघाडी कायम ठेवली होती, मात्र या नव्या राजकीय समीकरणांमुळे राज्यातील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने मोठी कामगिरी करत शंभराहून अधिक जागा मिळवल्या असून आता त्यांना सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला उर्वरित पाठिंबा मिळाल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांच्या पाठिंब्यासह इतर काही गटही टीव्हीकेच्या बाजूने उभे राहिल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयानंतर तामिळनाडूच्या राजकारणात नव्या युती आणि समीकरणांची चर्चा सुरू झाली असून पुढील काही दिवस राज्याच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.