मुंबई
Dacoit Movie डकैत’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट 8 मेपासून प्राइम व्हिडिओ वर एक्सक्लुझिव्ह पद्धतीने जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. प्राइम व्हिडिओने या तेलुगू अॅक्शन-थ्रिलरच्या जागतिक प्रदर्शनाची घोषणा केली असून हा चित्रपट भारतासह जगातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक शनील डिओ यांनी दिग्दर्शित केला असून सुप्रिया यारलागड्डा यांनी अन्नपूर्णा स्टुडिओजच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे.

चित्रपटात अदिवी शेष, Dacoit Movie मृणाल ठाकुर, अनुराग कश्यप आणि प्रकाश राज यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट दमदार अॅक्शनसोबत प्रेम, विश्वासघात आणि स्वतःला बदलण्याच्या भावनिक प्रवासावर आधारित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा हरी उर्फ रोमिओ (अदिवी शेष) याच्या आयुष्याभोवती फिरते. त्याच्या प्रेयसी सरस्वती उर्फ जुलियेटशी संबंधित खूनप्रकरणात त्याच्यावर आरोप होतात आणि तो तुरुंगात जातो. तुरुंगातून पळून गेल्यानंतर त्याचा थरारक पाठलाग सुरू होतो. या प्रवासात एक वेगळ्या शैलीचा पोलीस अधिकारी (अनुराग कश्यप) आणि मोठ्या हॉस्पिटल साम्राज्याचा प्रभावशाली पण संशयास्पद मालक (प्रकाश राज) त्याच्या मागावर असतात.आपल्या आयुष्याचा नाश करणाऱ्यांना सामोरे जाण्यासाठी हरीचा संघर्ष सुरू असताना, 13 वर्षांनंतरही जुन्या प्रेमाची ओढ त्याला सतावत राहते. यानंतर बदला, भावनिक संघर्ष आणि सततचा अॅक्शन यांचा संगम असलेली कथा उलगडत जाते. या चित्रपटात प्रेम आणि बदला यांच्यातील संघर्षात शेवटी विजय कोणाचा होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.