दिग्रसला महत्वाच्या कार्यालयांचा कारभार प्रभारी

नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप

    दिनांक :06-May-2026
Total Views |
अभय इंगळे,
दिग्रस, 
digras-office-administration-officer : शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाèया अत्यंत महत्वाच्या तीन कार्यालयांचा कारभार सध्या प्रभारी अधिकाèयांकडे सोपविण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजीची भावना तीव्र होत चालली आहे.
 
 
 
y6May-Digras-N-P
 
 
 
नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्याची जबाबदारी असलेल्या दिग्रस नगर पालिकेच्या मुख्याधिकाèयांचे पद रिक्त आहे. ते प्रभारावर असल्याने प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत विलंब होत असून अनेक प्रश्न प्रलंबित असून विकास कामे रखडलेली आहेत.याचबरोबर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेले पोलिस ठाणेदारदेखील प्रभारी असल्यामुळे गुन्हेगारी नियंत्रण, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसेच, वीज वितरण विभागाच्या शहर विभागातील सहायक अभियंता पदही प्रभारीकडे असल्याने वीजपुरवठा, देखभाल, दुरुस्ती कामे आणि तक्रार निवारण यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
 
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली ही तिन्ही महत्वाची कार्यालये प्रभारींवर चालत असल्याने प्रशासकीय समन्वय ढासळला आहे. नागरिकांना मूलभूत सेवांसाठी वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी अधिक आहे.
 
 
आमच्या समस्या ऐकून घेणारे आणि त्यावर तातडीने उपाय करणारे जबाबदार अधिकारीच उपलब्ध नसतील, तर आम्ही दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी त्वरित पूर्णवेळ अधिकाèयांची नियुक्ती करून प्रशासनाची घडी पूर्ववत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. एकूणच, दिग्रस शहरातील या प्रशासकीय अनिश्चिततेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक ठरत आहे.