प्रा. दिनेश सूर्यवंशी भाजपाचे विदर्भ संयोजक

    दिनांक :06-May-2026
Total Views |
अमरावती, 
dinesh-suryavanshi : भारतीय जनता पार्टीचे संघटन व कार्यविस्तारासाठी विभागास्तरावर समन्वयक संयोजक आणि सहसंयोजक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भाच्या संयोजकपदाची जबाबदारी अमरावतीचे भाजपा नेते प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्यावर देण्यात आली आहे.
 
 

amt 
 
 
 
प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे हे विदर्भाचे समन्वयक असतील तर आ. प्रवीण दटके हे सहसंयोजक पदाची धुरा सांभाळणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल रात्री या नियुक्त्या जाहीर केल्या. येत्या काळात पक्ष समन्वय तसेच सर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नियुक्त करण्यात आलेल्या या पदाधिकार्‍यांवर राहणार आहे. प्रा. सूर्यवंशी यांनी पक्षात आतापर्यंत विविध पदांवर काम केले आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्याचेही ते अध्यक्ष राहीले आहेत. त्यांच्या नियुक्तीचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत होत आहे.