मुंबई
drishya adrishya marathi movie काही चित्रपट आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयाच्या बळावर रसिकांवर मोहिनी घालतात. ‘दृश्य-अदृश्य’ हा आगामी मराठी चित्रपट विविध वैशिष्ट्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. उत्कंठावर्धक शीर्षकामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता अगोदरच शिगेला पोहोचली असताना नुकतेच ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. १९ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाने जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळविले. त्यामुळे या चित्रपटाची चहूबाजूला चर्चा रंगली. आता पोस्टर प्रदर्शनामुळे हा चित्रपट पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. आरएसटी कॅनव्हास निर्मित ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, drishya adrishya marathi movie धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मराठी सिनेसृष्टीसेबतच हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.