जरा जपून...तापमान 45 अंशांपर्यंत जाणार!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
मुंबई,
emperature will reach 45 degrees राज्यात पुन्हा एकदा उष्णतेचा प्रकोप वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पुढील काही दिवसांत हे तापमान पंचेचाळीस अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
 
 
temperature
 
कोकण परिसरातील रायगड जिल्ह्यातही उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येथे हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला असून वातावरणातील उकाडा पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच तीव्र उन्हामुळे जनजीवनावर परिणाम जाणवत आहे. या परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना दुपारी बारा ते तीन या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यासच बाहेर जावे, पुरेसे पाणी प्यावे, हलक्या आणि सैल कपड्यांचा वापर करावा, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.