बनावट दिव्यांगांमुळे खरे दिव्यांग अडचणीत

पडताळणी करण्याची मागणी

    दिनांक :06-May-2026
Total Views |
मानोरा,
fake disability certificates खर्‍या दिव्यांगांच्या सवलती लाटण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून लाभ घेणार्‍यांची पडताळणी करावी, अशी मागणी ’आधार’ या दिव्यांगांच्या कल्याणासाठी लढणार्‍या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन देऊन करण्यात आली. बनावट दिव्यांगांमुळे खरे गरजू दिव्यांग सवलतींपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
 

fake disability certificates India, bogus disabled benefits scam Maharashtra, 
आधार - शिक्षा स्वयंरोजगार, स्वावलंबन’ या नानकीदादी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, भुली द्वारा संचालित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन तहसीलदार, मानोरा यांना देण्यात आले. जे खरोखर दिव्यांग आहेत त्यांच्याऐवजी बनावट प्रमाणपत्र काढून घुसलेले लोक सवलतींचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खर्‍या दिव्यांगांवर अन्याय होत आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणार्‍यांची सखोल चौकशी करून तहसील कार्यालयात यादी लावून तपासणी करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
शासनाच्या विविध fake disability certificates  योजना खर्‍या गरजू दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मात्र काही लोक बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाच्या सवलती लाटत आहेत. यामुळे खर्‍या दिव्यांगांना वंचित राहावे लागण्याची भीती आहे. म्हणून सर्व दिव्यांगांची फेरतपासणी करून बनावट दिव्यांगांना योजनेतून वगळावे, अशी मागणी प्रा. जय चव्हाण यांनी केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.