आगीने घेतले भीषण रूप; तेहरान प्रांतात ८ जणांचा मृत्यू

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तेहरान,
fire in tehran इराणमध्ये राजधानीजवळ घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तेहरान प्रांतातील अंदिशे शहरातील एका व्यापारी संकुलात लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


fire

मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. बहुमजली इमारतीतून निघणाऱ्या दाट धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बचाव पथकांनी अनेकांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेचा सध्या कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीशी संबंध आढळून आलेला नाही.fire in tehran अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले असून पुढील तपासानंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे.