ज्येष्ठ नागरिक मंडळ यवतमाळद्वारा आरोग्य तपासणी

वय वंदन कार्ड सेवा शिबिराचेही आयोजन

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
health-check : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) विदर्भ शाखा वडगावच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिक मंडळद्वारा सदस्य व कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात संघटनेचे डॉ. रवी दुर्गे, डॉ. राजसिंग खोवरे, डॉ. अशोक बोबडे, डॉ. उमरे, डॉ. शिंदे, डॉ. घोडे यांच्याद्वारा आरोग्य तपासणीसह सावरगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तंत्रज्ञांद्वारा रक्त तपासणी व अडपल्लीवार यांच्याद्वारा संगणकीय डोळे तपासणीचा 150 ज्येष्ठ नागरिक सदस्य तथा कुटुंबियांनी लाभ घेतला.
 
 
y6May-Tapasani
 
 
 
यावेळी संगणक परिचालक गोसावी यांचेद्वारा आयुष्मान भारत कार्ड तथा वय वंदन कार्ड नोंदणीच्या सेवादेखील उपलब्ध करण्यात आल्या होत्या. 50 ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. तत्पूर्वी या परिसरातील नगरसेवक कीर्ती राऊत व दिलीप काळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरादरम्यान नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
 
 
कार्यक्रमाचे संचालन अनिल दुर्गे यांनी केले. राजन टोंगो यांनी ‘निमा’प्रती कृतज्ञता केली. निमासह ज्येष्ठ नागरिक मंडळ आरोग्य समितीचे विनोद सहस्रबुद्धे, डॉ. सीबी अग्रवाल, ओंकार ढोले, प्रकाश दामले, विजय उपलेंचवार, प्रल्हाद हिंगमिरे, चित्रा देशपांडे, पांडुरंग ढुमणे, पांडुरंग मुसळे, कृष्णा तपके व विनोद राजनकर यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.