जुगलकिशोर अग्रवाल सन्मानित

    दिनांक :06-May-2026
Total Views |
सिंदीरेल्वे
Jugalkishore Agrawal प्रसिद्ध उद्योजक जुगलकिशोर अग्रवाल यांना महालक्ष्मी सभागृहात नगराध्यक्ष राणी कलोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. राजस्थानी मंडळ, व्यापारी संघ तसेच गणपती देवस्थानच्या सौजन्याने महालक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्र चिकित्सक डॉ. सचिन डायगव्हाणे होते. तसेच महागुजरात सिडसचे संचालकद्वय रमेश अग्रवाल, अशोक जोशी, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल कलोडे, निळकंठ घवघवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार ओमप्रकाश राठी यांनी जुगलकिशोर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
 

 Jugalkishore Agrawal 
सत्काराला उत्तर देताना अग्रवालJugalkishore Agrawal  यांनी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपावी, शहराचा सर्वांगीण विकास साधा, बंधूभाव वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, याचे सदैव स्मरण ठेवा, असे आवाहन केले. संचालन व प्रास्ताविक अ‍ॅड. परिक्षित पेटकर यांनी केले तर आभार रमेश अग्रवाल यांनी मानले.