करिना ठाकूर वाणिज्य शाखेत पुलगावातून प्रथम

    दिनांक :06-May-2026
Total Views |
पुलगाव
Karina Thakur नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. विशेष म्हणजे, करिता संदीपसिंह ठाकूर या विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेत ८९.३३ टके गुण घेऊन शहरातून प्रथम क्रमांक पटकावला.
 

Karina Thakur 12th commerce topper Pulgaon, 
इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दिशा भट्टड हिने विज्ञान शाखेत ९४.३३ टके गुण प्राप्त करून जिल्ह्यात द्बितीय आणि पुलगाव शहरात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर करिना ठाकूर हिने वाणिज्य शाखेतून पुलगावातून प्रथम क्रमांक पटकावला. दरम्यान, नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर यांनी दोन्ही विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, नगरसेवक रवी केसरवानी, अमरदीप देशमुख, सुहास नागदिवे यांची उपस्थिती होती.