नागपूर,
Keshavnagar Kalaniketan केशवनगर कलानिकेतन आयोजित दहा दिवसीय उन्हाळी शिबिराचा समारोप अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.समारोप कार्यक्रमास सुप्रसिद्ध गायक तथा ईटीव्ही युवा फेम भूषण जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, सचिव प्रशांत तुंगार, मुख्याध्यापक मिलिंद भाकरे, धारणा खळतकर, मेधा कुलकर्णी व संध्या अग्नीहोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरादरम्यान प्राची मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध गीत प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. अवनी बोरकर, गायत्री खापरे आणि शिवस्वी बांगरे Keshavnagar Kalaniketan यांनी आपले अनुभव मनोगताच्या स्वरूपात व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन नीता तळेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल भेंडारकर, रजनी उगे, वेद जिचकार, सारिका राघोर्ते आणि स्नेहल आंबीलडुके यांनी विशेष परिश्रम घेतले.या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.
सौजन्य:कल्पना वाराणशीवर,संपर्क मित्र