वर्धेतही लव्ह जिहाद; आरोपीस अटक

-आणखी चार मुली संपर्कात -पत्रपरिषदेत संतोषसिंह ठाकूर यांची माहिती

    दिनांक :06-May-2026
Total Views |
वर्धा,
love jihad in wardha पुणे, अमरावती, अकोल्यानंतर वर्धेतही लव्ह जिहादचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्या धर्माबाबत प्रचार करून तिच्या मनात धर्मांतरणाचे बीज रोवले. मुलीनेही रमजान महिन्यात रोजे ठेवले. ऑनलाइन बुरखाही मागविला. मुलगी दररोज नमाज पठन करीत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. मुलीच्या नातेवाईकांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाकडे धाव घेतली. बजरंग दलाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. पोलिसांनी तपास करून रेहान फारूख अली (२०) रा. चितोडा रेल्वे गेटजवळ, पुलफैल याला अटक केली. मुलीच्या बयाणात आणखी चार मुली रेहानच्या संपर्कात असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष संतोषसिंह ठाकूर यांनी बुधवार ६ रोजी गोल बाजार स्थित श्रीराम मंदिरात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 

वर्धेतही लव्ह जिहाद 
 
 
पत्रकार परिषदेला आंतरराष्ट्रीय दुर्गाशती परिषदेच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष शितल बघेल, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजसम्राट बघेल, अखिल आर्यवत संघाचे जिल्हा महामंत्री श्याम देशपांडे उपस्थित होते. संतोषसिंह ठाकूर पुढे म्हणाले, अल्पवयीन मुलीशी आरोपी रेहानने जवळीक साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला शहरातीलच एका लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार तीन ते चार वेळा घडला. त्यानंतर रेहानने आपचा धर्म किती चांगला आहे, याबाबत तिचे ‘ब्रेन वॉश’ केले. त्यामुळे मुलगी आता मुस्लिम धर्माकडे वळली असून दररोज अरबी भाषेत पाचवेळा नमाज पठन करते. सोबतच ऑनलाइन बुरखाही मागविल्याने कुटुंबीयांची चिंता वाढल्याने त्यांनी आमच्याकडे तक्रार नोंदविली होती. आम्ही तात्काळ पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. पोलिसांनी चौकशी करून रेहान फारूख अली याला अटक करून त्याची पोलिस कोठडी घेतली. रेहानच्या संपर्कात अजून चार मुली असल्याची माहितीही ठाकूर यांनी यावेळी दिली.
 
यावेळी बोलताना शितल बघेल म्हणाल्या की, मुलीची रेहानसोबत ओळख झाल्यानंतर मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रेहानने तिच्याशी जवळीक साधली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. रेहानसोबन आणखी तीन-चार मुलांचा ग्रुप आहे. ते दररोज मुलींना रात्री घेऊन जातात आणि आपल्या अरबी धर्मग्रंथाबाबत चांगल्या गोष्टी सांगून त्यांचे ब्रेन वॉश करीत असल्याचेही शितल बघेल यांनी सांगितले. अजून चार मुली यात अडकल्या आहेत. पीडित मुलीचा मोबाईल तपासला असून काही धकादायक व्हिडीओ, फोटोज आणि अ‍ॅपही आढळून आले आहे. मुलीचे बयाण नोंदविले असता नमाज पठन केल्याने मला आत्मीक सुख मिळत असल्याचे तिने सांगितले. सध्या तिचे समुपदेशन सुरू असल्याचेही शितल बघेल यांनी सांगितले.
 
राजसम्राट बघेल म्हणाले की, फिटनेस जीमच्या माध्यमातूनही मुलींना ओढल्या जात आहे. लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लव्ह जिहादच्या घटनांवर अंकुश लावण्याकरिता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार असून तीन ते चार जणांची चमू तयार करून जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.love jihad in wardha श्याम देशपांडे म्हणाले, लव्ह जिहाद ही चिंतनीय बाब आहे. देशात धर्मपरिवर्तन कायदा झाला. मात्र, या कायद्यालाही जुमानत नाही. त्यामुळे यासाठी धर्मजागृती आणि जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले