नारायण साईचा जामीन अर्ज फेटाळला

    दिनांक :06-May-2026
Total Views |
सुरत
Narayan Sai's bail application rejected सुरत येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेल्या नारायण साईला गुजरात उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. आपल्या शिक्षेला स्थगिती द्यावी आणि जामीन मंजूर करावा, या मागणीसाठी त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या.
 
 
 
narayan
खंडपीठाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून अशा प्रकरणांमध्ये सवलत देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे शिक्षेला स्थगिती देण्याची मागणीही न्यायालयाने नाकारली. याचबरोबर त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला. २०१३ मध्ये सुरतमध्ये घडलेल्या या प्रकरणात नारायण साईवर लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झाले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. आता उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या निर्णयातून गंभीर गुन्ह्यांबाबत न्यायालयाची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.